शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाऊसमान सामान्य राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:17 IST

पुढील चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

पुणे : कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा असून, पुढील २ ते ३ दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने येत्या आठवड्यात मध्य व उत्तर भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्यातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील माथेरान ३०, अंबरनाथ, दोडामार्ग, कर्जत, राजापूर, सांगे, सावंतवाडी २० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी हलक्या सरी आल्या होत्या. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, राधानगरी ३०, गगनबावडा, इगतपुरी २० मिमी पाऊस झाला. विदर्भात चिखलदरा २०, आमगाव, बाळापूर, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, गोरेगाव, मोताळा, सडक अर्जुनी, सालेकसा, तुमसर, यवतमाळ १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील अम्बोणे, कोयना ५०, शिरगाव, ताम्हिणी ४०, शिरोटा, वाणगाव, दावडी ३०, डुंगरवाडी २०, लोणावळा ६० मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी दिवसभरात महाबळेश्वर १६, सातारा २, मुंबई २, नागपूर ४ मिमी पाऊस झाला. २७ ते २९ जुलैदरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील २६ जुलै ते १ आॅगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. १ जून ते २५ जुलैपर्यंत देशात सरासरीच्या ३ टक्के कमी पाऊस झाला असून, मध्य भारतात सरासरीच्या १६ टक्के, दक्षिण भारतात ९ टक्के जादा पाऊस झाला आहे. पूर्व व उत्तरपूर्व भारतात सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, त्यामुळे या भागात पाऊस होत आहे़ येत्या २ ते ३ दिवसांत पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व लगतच्या प्रदेश या आतापर्यंत कमी पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र