राज्यात पावसाचे प्रमाण घटले
By Admin | Updated: August 23, 2015 01:43 IST2015-08-23T01:43:02+5:302015-08-23T01:43:02+5:30
मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शनिवारी कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्याव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित

राज्यात पावसाचे प्रमाण घटले
पुणे : मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शनिवारी कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्याव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळक पाऊस पडला. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने कोकणात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला असला तरी शनिवारी तेथे काही भागातच पाऊस पडल्याची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तर पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या २४ तासांत केंपे येथे ५० मिमी पाऊस पडला. त्या पाठोपाठ महाबळेश्वर येथे ३०, कर्जत, भिवपुरी, दावडी येथे २०, अलिबाग, दापोली, गुहाघर, कणकवली, खालापूर, मालवण, माथेरान, मुरूड, रोहा, ठाणे, पाली, चंदगड, गगनबावडा, इगतपुरी, आमगाव, सालेकसा येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडला.
पुढील ४८ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.