येत्या ७२ तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 19:29 IST2016-08-21T19:29:48+5:302016-08-21T19:29:48+5:30
दहा दिवस उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन दिवस संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

येत्या ७२ तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस !
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २१ : दहा दिवस उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन दिवस संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. देशात दक्षिण, उत्तरप्रदेश व लगतच्या ईशान्य मध्यप्रदेशावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम मध्यप्रदेश व लगतच्या पूर्व राजस्थानावर आहे.
दरम्यान, यावर्षी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला. आॅगस्ट प्रथम आठवड्यापर्यंत पाऊस सुरू च होता; पण गत दहा दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या आंतरमशागतीची कामे करण्यास वेळ मिळाला आहे. आता पुन्हा येत्या ७२ तासात विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, २२ ते २३ आॅगस्ट रोजी कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २४ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.