मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बाऊरला माशांचा पाऊस

By Admin | Updated: July 12, 2016 20:05 IST2016-07-12T20:05:14+5:302016-07-12T20:05:14+5:30

द्रुतगती महामार्गावर माशांचा पाऊस खच पडला आहे. कोणी म्हणतेय मासे ओढ्याद्वारे रस्त्यावर आले. याबाबत सध्या व्हॉट्स अपवर जोरदार पोस्ट पडत आहेत.

Rainfall of fish in Mumbai-Pune express bureau | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बाऊरला माशांचा पाऊस

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बाऊरला माशांचा पाऊस

ऑनलाइन लोकमत

उर्से, दि. 12 - द्रुतगती महामार्गावर माशांचा पाऊस खच पडला आहे.  कोणी म्हणतेय मासे ओढ्याद्वारे रस्त्यावर आले. याबाबत सध्या व्हॉट्स अपवर जोरदार पोस्ट पडत आहेत. ही घटना दोन दिवसापूर्वी मावळ तालुक्यातील बउरवाडी येथे घडली. गेली दोन दिवसापासुन द्रुतगती महामार्गावर पसरलेले मासे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकमतच्या प्रतिनिधीने या घटनेचा मागोवा घेतला. त्यावेळी समोर आलेली माहिती अशी द्रुतगती महामार्गावर जवळील बउरवाडी पुलाजवळ घडलेल्या घटनेबाबत येथील स्थानिक दत्ता वायभट यांना विचारले असता त्यांनी घडलेली घटना सत्य असुन मासे घेऊन जाणारी एक छोटी गाडी येथे पल्टी झाली. गाडीतील मांगुर मासे सर्व रस्त्यावर पसारले.यामुळे दोन्ही बाजुकडील वाहतुक काही वेळेपुरती बंद होती.माञ अश्या प्रकारची हि घटना गेली तीन वर्षात अनेकदा घडल्याचे सांगितले.

उर्से येथील अशोक कारके यांनीही मी पवनानगर येथे जात असताना गर्दीमुळे पहावयास गेलो असताना रस्त्यावर सर्वञ मांगुर मासे पसरले होते.मुंबई कडुन पुणे कडे जात असताना टायर पंक्चर झाल्याने पीकअप व्हँन पल्टी झाली.यामुळे गाडीतील सर्व मांगुर मासे रस्त्यावर पसरले.यावेळी लोकांची मासे घेण्यासाठी उडालेली धावपळ बघता चालकाने मासे नेवु नका सांगितले परंतु कोणीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते.यामध्ये थांबलेल्या वाहनचालकांनीही मांगुर माशांवर गाडीतुन उतरुन हात मारला.

Web Title: Rainfall of fish in Mumbai-Pune express bureau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.