पावसाने वनबंधारा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:06 IST2017-07-21T00:05:57+5:302017-07-21T00:06:14+5:30
कळवण तालुका : बिलवाडी येथे पाच जनावरे दगावली; शेतकऱ्यांचे नुकसान

पावसाने वनबंधारा फुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : बिलवाडी , मोकभणगी व मुळाणे येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून, मोकभणगी येथे घरांची पडझड झाली आहे.
बिलवाडी येथे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरात बिलवाडी येथे ५ जनावरे वाहून गेल्याने दगावली आहे. मुळाणे येथील वनबंधारा फुटल्याने परिसरातील शेतीपिकांचे व शेतीचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. बुधवारी बिलवाडी, मोकभणगी व मुळाणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने बिलवाडी येथील नदीला पुर आला. घरांची पडझड होऊन घरांच्या भिंती पडल्या असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोकभणगी परिसरात रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रामचंद्र बागुल, तुकाराम बागुल यांचेजनावरे वाहून गेले. मोकभणगी येथील संजय धोंडू शेवाळे, सुमन संतोष शेवाळे यांच्या घरांची पडझड झाली आहे. तालुक्यात सरासरी २२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केले. घटनास्थळी तहसीलदार कैलास चावडे यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांना दिलासा दिला.शासनस्तरावरून बाधितांना नुकसानभरपाई देण्याबाबत प्रस्ताव तयार करु न आपत्ती व्यवस्थापनमधून तत्काळ मदत देण्याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांनी संबधितांना सुचना केल्या आहेत. मोकभणगी परिसरातील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार चावडे यांनी दिले आहेत. मुळाणे येथील शेतिपकांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केली आहे.पावसामुळे बिलवाडी, मोकभणगी व मुळाणे येथे नुकसान झाले असून बंधारा फुटल्याने शेतीचे व शेतपीकांचे नुकसान झाल्याने महसूल प्रशासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करु न आदीवासी शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा
- नितीन पवार, सदस्य जिल्हा परिषद नाशिक