शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण मोहिमेला पावसाचा ‘ब्रेक’

By admin | Updated: August 4, 2014 00:17 IST

शतकोटी वृक्ष लागवड मोहिम रखडली

वाशिम: पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांमध्ये शतकोटी वृक्ष लागवड मोहिम पावसाच्या लहरीपणाची शिकार ठरत आहे. पाऊस लांबल्याने वृक्ष लागवड मोहिमेलाही ब्रेक लागले आहेत.वनसंपदेवर मानवी कुर्‍हाड कोसळल्याने निसर्गचक्राचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी पदोपदी घेत आहे. गरजांची पूर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गावर विजय मिळविण्याच्या मानवी प्रयत्नांनी भूतलावरील स्वत:च्या अस्तित्वालाच धोका निर्माण केल्याची साक्ष पर्यावरणाचा असमतोलपणा देत आहे. या पृष्ठभूमीवर पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून, शतकोटी वृक्ष लागवड मोहिम राज्य शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यास ११ लाख आठ हजार, अकोला जिल्ह्यास १७ लाख तर बुलडाणा जिल्ह्यास जवळपास १५.५0 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी उन्हाळ्याच्या अखेरीस वृक्षारोपणासाठी खड्डेही खोदून ठेवण्यात आले होते. साधारणत: जून महिन्यामध्ये पाऊस आल्यानंतर वृक्ष लागवड मोहिम सुरू होण्याची अपेक्षा असते; मात्र यावर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले. जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता, शतकोटी वृक्ष लागवड मोहिम जागेवरच थांबली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने वृक्ष लागवड करण्याची जोखीम उचलली जात नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.** वाशिम जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे उद्दिष्टवनविभाग व ग्रामीण विकास यंत्रणेला २0१४-१५ या वर्षात प्रत्येकी चार लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.सामाजिक वनीकरण विभाग एक लाख तर कृषी विभागाला एक लाख ८ हजाराचे उद्दिष्ट आहे.वाशिम तालुका एक लाख ९५ हजार, मालेगाव तालुका एक लाख ९0 हजार, रिसोड तालुका एक लाख ९४ हजार ५00, मंगरुळपीर तालुका एक लाख ९४ हजार ५00, कारंजा तालुका एक लाख ९0 हजार ५00 तर मानोरा तालुका एक लाख ४३ हजार ५00 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.