Rain Update ( Marathi News ) : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या जोरदार पावसांच्या सरीमुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली. वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी आडोशाचा आधार घेतला. मुंबईतही काही ठिकाणी सकाळी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने पुढचे काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे.
कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाड्यातही पावसाचा अंदाज दिला आहे. मुंबईत काल रविवारपासूनच पावसाचे वातावरण झाले आहे, आज पहाटे काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचे वातावरण आहे. मुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला
पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता तसेच काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
रत्नागिरीत पहाटेपासून जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या जोरदार पावसांच्या सरीमुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळी ची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.