मुंबईत पाऊस सुरूच, पालिकेच्या कामाचा फज्जा
By Admin | Updated: June 19, 2015 18:57 IST2015-06-19T18:57:53+5:302015-06-19T18:57:53+5:30
मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले असून पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला आहे. ठाणे – वाशी – पनवेल ट्रान्सहार्बर लोकल सुरू झाली असून पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते विरारपर्यंत सुरू

मुंबईत पाऊस सुरूच, पालिकेच्या कामाचा फज्जा
आँनलाइन लोकमत
मुंबई, दि, १९ – मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले असून पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला आहे. ठाणे – वाशी – पनवेल ट्रान्सहार्बर लोकल सुरू झाली असून पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते विरारपर्यंत सुरू करण्यात आली आहे. तर मध्यरेल्वे अजूनही ठप्प आहे.
तेसच उद्याही जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगत महानगर पालिकेच्या आयुक्तांनी उद्या शाळाबंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मिठी नदीच्या धोक्याची पातळी २.७ मीटर इतकी असून आज मिठी नदीमध्ये २.५ मीटर इतके पाणी साचल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे मुंबईची जीवनवाहीनी असलेल्या लोकलसेवा अत्यंत धिम्यागतीने सुरू होताच पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे.