राज्यात काही ठिकाणी पाऊस
By Admin | Updated: June 3, 2014 22:08 IST2014-06-03T20:19:35+5:302014-06-03T22:08:14+5:30
राज्यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

राज्यात काही ठिकाणी पाऊस
पुणे : राज्यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यभर ढगाळ हवामान असले तरी विदर्भात आलेली उष्णतेची लाट आजही कायम होती. राज्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपूरीत होते.
राज्यभर पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात पावसाने हजेरी लावली. सातारा, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ६ मिमी, पुण्याच्या लोहगाव भागात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
विदर्भात आजही सूर्य आग ओकत होता. तेथील बहुतांशी शहरांचे तापमान ४३ अंशाच्या वर होते.
पुढील ४८ तासात राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.१, जळगाव ४४.७, कोल्हापूर २९.७, महाबळेश्वर २२.५, मालेगाव ४२.८, नाशिक ३८, सांगली ३१.१, सातारा २८.४, सोलापूर ३३.३, मुंबई ३४.२, अलिबाग ३६.३, डहाणू ३५.२, रत्नागिरी ३९, औरंगाबाद ३९, परभणी ४०.९, नांदेड ४३, अकोला ४३.६, अमरावती ४४.८, बुलडाणा ४१.७, चंद्रपूर ४०, गोंदिया ४३.१, नागपूर ४२.४, वाशीम ४१, वर्धा ४२.८, यवतमाळ ४२.
महाबळेश्वर कूल, कमाल तापमान २२ अंशापर्यंत खाली
राज्याच्या बहुतांशी भागांचे तापमान वाढत असताना आज महाबळेश्वरच्या तापमानात मोठी घट झाली. कालपर्यंत ३० अंशापर्यंत असलेले महाबळेश्वरचे तापमान आज २२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस होते. कमाल आणि किमान तापमानात अवघा ३ अंशाचा फरक होता. याचबरोबर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या शहरांचे तापमानही घटले होते.