शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणासंगे पाऊसधारा, मुंबई, कोकणासह कोल्हापूरला पाऊस बरसला; गडचिरोलीत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:40 IST

श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला.

मुंबई : श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.पुढील २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ मराठवाड्यात मात्र पुरेसा पाऊस झालेला नसून, औरंगाबादसह काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००, ‘वारणा’मधून ४,३७३ तर दूधगंगेतून २,५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात ५० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात सुमारे ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी शनिवारपासून भिज पावसाला सुरुवात झाली़ किनवट मंडळात अतिवृष्टी, तर बिलोली तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे़ पुढील तीन दिवसांत मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मोठा पाऊस होण्यासाठी मात्र अनुकूल परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र