शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:56 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़

मुंबई/पुणे/कोल्हापूर/अकोला: खरीप पिके हाताशी आली असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. कोकणातील भातपिके तर मराठवाडा विदर्भातील सोयाबीनसारखी खरीप पिके जमीनदोस्त केली. तर वीज कोसळून मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील दोघे जण मरण पावले तर आठ जण जखमी झाले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत कोकणातील वेंगुर्ला ११०, देवगड १००, पेडणे ८०, महाड ७०, वैभववाडी ६०, रत्नागिरी ५० मिमी, तर मध्य महाराष्ट्रातील कर्जत १००, पन्हाळा ९०, खंडाळा बावडा ८०, बारामती, कोरेगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शनिवारी रात्री रविवारी झालेल्या जोरदार पावसाने भाताची पिके जमीनदोस्त झाली. सोलापूरमध्ये भरपावसात शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा शॉक बसून तो ठार झाला.मराठवाड्यात तिघांचा मृत्यूमराठवाड्यत रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठणच्या जायकवाडी धरण व परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जात आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडले आहे.

टॅग्स :Rainपाऊस