कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

By Admin | Updated: May 7, 2014 21:22 IST2014-05-07T20:51:56+5:302014-05-07T21:22:57+5:30

दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला

Rain in many places in the state with Konkan | कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

रेल्वे, रस्ते वाहतुक विस्कळीत

पुणे : दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला असून येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़
अचानक आलेल्या या पावसाने मुंबई, पुणे महामार्गावरील रस्ते वाहतुक अनेक ठिकाणी ठप्प झाली होती़ तर खंडाळा घाटात रेल्वमार्गावर झाड पडल्याने पुण्याकडे येणार्‍या सिंहगड, प्रगती एक्सप्रेस, चिन्नई एक्सप्रेससह अनेक गाड्या वाटेत खोळंबून राहिल्या आहेत़ पुण्याहून मुंबईला जाणार्‍या डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस वाटेत थांबून ठेवण्यात आल्या होत्या़
कोकणातील सिंधदुर्ग, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, रोहा, ठाणे तसेच मुंबईच्या उपनगरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली़ तसेच कर्जत, लोणावळा, खंडाळा, तळेगाव परिसरात आज सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ अनेक ठिकाणी मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता़
कर्जत ते खंडाळा या घाट मार्गात रेल्वेमार्गावर आज दुपारी पावणेचारच्या सुमारास एक झाड उन्मळून पडले़ त्यामुळे मुंबई -पुणे रेल्वे वाहतुक ठप्प झाली़ मुंबईहून पुण्याकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस नेरळ येथे थांबवून ठेवण्यात आली़ त्याच्या पाठोपाठ येणारी, चिन्नई एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीनही वाटेत थांबविण्यात आल्या होत्या़ पुण्याहून जाणारी डेक्कन एक्सप्रेस लोणावळा येथे थांबविण्यात आली होती़ लोणावळ्याहून स्वतंत्र गाडी पाठवून रेल्वेमार्गावर पडलेले हे झाड बाजूला केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर वाहतुक पुन्हा सुरु झाली़ त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसला पुण्यात पोहचण्यास सुमारे २ तास उशीर झाला़
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात मराठवाड्यात काही ठिकाणी आणि कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ७, महाबळेश्वर ७, सोलापूर ०़१, भिरा ८, रत्नागिरी ८, उस्मानाबाद २ मिमी पावसाची नोंद झाली होती़
पुढील ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुणे व परिसरात सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे़
केरळ व परिसरात कमी दाबाचा प˜ा निर्माण झाल्याने तामिळनाडूत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण कर्नाटक, केरळ तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नाग्रालंड, मणीपूर येथे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़

Web Title: Rain in many places in the state with Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.