शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:40 IST

कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

मुंबई : राज्यात मंगळवारी मुंबईसह कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसाने जोरदार दणका दिला. ओढे, नाले, नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वाधिक फटका कोकणाला बसला. घाटांत दरडी कोसळल्याने येथील काही मार्गही ठप्प झाले आहेत.

अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले. अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टी झाली. तिवसा आठवडी बाजारात आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरले. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. खजरी-खोडशिवणी मार्गावरील पूल वाहून गेला. तर बाह्मणी-दल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला होता. चूलबंद नदी दुथडी भरून वाहत आहे. तिरोडा शहरातील काही वस्त्यांना पाण्याचा वेढा घातल्याचे चित्र होते. अकोला, बुलडाणा, यवतमाळ  जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.  

 

टॅग्स :Rainपाऊस