शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:30 IST

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्यानंतर तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात  ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बांगलादेशच्या किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा पुढील प्रवास खेपुपारच्या पूर्वेला होईल. बांगलादेशची किनारपट्टी ओलांडल्यानंतर त्या पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल ओलांडण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.मुंबईत पावसाने आता बऱ्यापैकी विश्रांती घेतली असली तरी मुंबईसाठीचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. या अलर्टनुसार, अधूनमधून येथे तुरळक सरींची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईत सकाळी ८:३० वाजेपर्यंत अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? २ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा३ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा 

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणेRaigadरायगड