पावसाचा तडाखा, ६ ठार
By Admin | Updated: May 21, 2014 03:49 IST2014-05-21T03:49:02+5:302014-05-21T03:49:02+5:30
गिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे.

पावसाचा तडाखा, ६ ठार
रत्नागिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी शिवारात मंगळवारी सायंकाळी ५च्या सुमारास वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. वीज पडल्याने शिवशंकर दिगंबर धुप्पे (वय ३०), सोजरबाई साधू पेंढारकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडगाव येथे वीज पडून १४ बकर्या मृत्युमुखी पडल्या. गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागांवर असलेले वळवाच्या पावसाचे ढग आज पूर्ण राज्यावर पसरले. पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्टÑ, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी पहाटे सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका चालत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा राजाराम कुरूप (६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) जागीच ठार झाल्या. दुसर्या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे धरणात बुडून अंत होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यात पेंडखळे येथील वठारवाडीमधील अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. लांजा तालुक्यात वेरळ येथे दुचाकी अपघातात अभिषेक अशोक लांजेकर (३५) या तरुणाचा मृत्यू झाला तर पन्हळे धरणावरील कामगार हरिदास लिंबाजी धनद्रव्ये (५५) यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)