पावसाने केली पोलखोल

By Admin | Updated: July 4, 2016 01:23 IST2016-07-04T01:23:36+5:302016-07-04T01:23:36+5:30

मुंढवा-केशवनगर परिसरात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली.

Rain has polarized | पावसाने केली पोलखोल

पावसाने केली पोलखोल


मुंढवा : मुंढवा-केशवनगर परिसरात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर रात्रभर सुरू होता. रविवारी दिवसभर पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी घरातच राहण्यास पसंत केले. शनिवारी रात्रीपासून सलग
मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व
रस्ते जलमय झाले. सुमारे दहा ते बारा तास पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
येथील रस्त्यावर वाहनचालकांना जाताना पाण्यातून आपली वाहने मार्गस्त करावी लागत होती. अनेक दुचाकीचालक घसरून लहान-मोठे अपघात होत होते. दुचाकीचालकांना अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याची कसरत करावी
लागली.
मुसळधार पावसातून मार्ग काढताना वाहनाचे दिवे लावूनच वाहनचालकांना मार्गक्रमण करावा लागला. पावसामुळे वाहतूककोंडी झाली होती. अचानक आलेल्या धो धो पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे गारठा अजूनच जाणवू लागला आहे. येथील सर्वच परिसरातील रस्ते जलमय झाले.
काही ठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे. (वार्ताहर)
>वीजपुरवठा खंडित
मुंढवा परिसरात शनिवारी पावसाने जोर धरल्यानंतर येथील सर्वच परिसरात सलग दहा ते पंधरा तास वीजप्रवाह खंडित झाल्याने नागरिकांची अक्षरश: झोप उडाली. नदीपात्राच्या परिसरात डास वाढल्यामुळे व त्यातच वीज नसल्याने मुंढवेकर मात्र हैराण झाले. महावितरण विभागाने असे प्रकार होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Rain has polarized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.