शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात पडला गारांसह पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:32 IST

जिल्ह्यात शनिवारी गारांसह झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी हा पाऊस द्राक्ष आणि इतर फळपिकांना नुकसानकारक ठरला आहे.

मुंबई/कोल्हापूर/पुणे/सोलापूर : चाळिशी पार केलेला उन्हाचा पारा अन् हैराण करणारा उकाडा अशा परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी गारांसह झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी हा पाऊस द्राक्ष आणि इतर फळपिकांना नुकसानकारक ठरला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही रात्री काही भागांत पाऊस पडला.गेले पंधरा दिवस राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. शनिवारी विजेचा कडकडाटासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वारे व गारांसह जोरदार पाऊस पडला. शिराळा, वाळवा, तासगाव तालुक्यातही गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते.सातारा शहरासह शहराच्या पश्चिमेस कास परिसरात शनिवारी सायंकाळी मेघगर्जनेह पावसाने हजेरी लावली. कास परिसरात मोठ्या प्रमाणावर गारांदेखील पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडतच होता. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला़ बारामतीतील सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु असतानाच पावसाच्या सरी आल्या़ सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. सायंकाळचा हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शनिवारी पहाटेपर्यंत १.६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती.शनिवारी सायंकाळी कोल्हापूर व महाबळेश्वर येथे १ आणि सातारा येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.>एक ठारशुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाºयाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे महादेव सिद्धाराम दिंडोरे (१३) हा मुलगा ठार झाला.राज्यासाठीचा अंदाज१४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ एप्रिल : मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह वादळी पाऊस पडेल.१६ एप्रिल : विदर्भात गारा पडतील.१७ एप्रिल : मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस पडेल.

टॅग्स :Rainपाऊस