राज्यात पावसाची हजेरी
By Admin | Updated: October 26, 2014 01:23 IST2014-10-26T01:23:31+5:302014-10-26T01:23:31+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.

राज्यात पावसाची हजेरी
मुंबई/पुणो : राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. गेल्या 24 तासात वेंगुर्ला येथे 5क् तर रत्नागिरीत 3क् मिमी पाऊस पडला.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता शनिवारी वाढल्याने हा पाऊस पडत आहे. दिवसभरात कोल्हापूरमध्ये 14 मिमी, पुणो, महाबळेश्वर, सांगली, बुलडाणा येथे प्रत्येकी 3 मिमी, औरंगाबाद, अकोला व अमरावतीमध्ये प्रत्येकी 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
द्राक्षबागा संकटात
सांगली : शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलो:यातील बागांना बसणार आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे.
कोल्हापुरात खरीप पिकांवर ‘पाणी’
कोल्हापूर जिलत शनिवारी दुपारी दीडर्पयत परतीचा पाऊस कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. पीक काढणी ठप्प झाली असून, सुगीलाच ब्रेक लागला आहे. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला आहे. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे.शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारी दीड वाजेर्पयत सुरुच होता़
सिंधुदुर्गात मुसळधार
सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी वादळी वा:यासह मुसळधार पाऊस झाला़ या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी करून वाळत ठेवलेले भात वाहून गेले, तर कापणीला आलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. गेल्या 24 तासांत जिलत सरासरी 27.क्2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आह़े
पश्चिम विदर्भात रिमङिाम
अकोला : शनिवारी अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम या जिलंत रिमङिाम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणो आहे. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिलंत रिमङिाम पाऊस झाला, तर अमरावती व वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण होते.
मुंबईत शिडकावा
च्मुंबईकरांना एकीकडे ऑक्टोबर हीटचे चटके बसत असतानाच दुसरीकडे शनिवारी मात्र मुंबापुरीवर दिवसभर मळभ दाटून आले.
च्यामुळे वातावरणात गारवा आल्याने ऐन दिवाळीत मुंबईकरांनी थंड वा:याची झुळूक अनुभवली. तसेच मुंबईसह परिसरात शिडकावा झाला़
च्राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे आज तापमानात मोठी घट नोंदविली गेली. कालर्पयत 37 अंशाच्या घरात असलेले कमाल तापमान घसरून 25 ते 28 अंशाच्या घरात आले. राज्यात सर्वाधिक 35.5 अंश सेल्सिअस तापमान नांदेडमध्ये नोंदविले गेले.