नववर्षाला पावसाची हजेरी

By Admin | Updated: January 2, 2015 00:48 IST2015-01-02T00:48:56+5:302015-01-02T00:48:56+5:30

मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढविला. जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या.

Rain fall of New Year | नववर्षाला पावसाची हजेरी

नववर्षाला पावसाची हजेरी

आणखी दोन ढगाळ वातावरण: ग्रामीण भागातही बरसला
नागपूर: मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढविला. जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र सांयकाळी पाणी आल्याने
मावळत्या वर्षाचा शेवटच्या आठवडा कडाक्याच्या थंडीत गेला असतानाच नवीन वर्षात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच वर्तविला होता. विशेष म्हणजे तो खराही ठरला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवसभर ढगांनी आकाशात गर्दी केली होती. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊनही वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दिवसभर बोचऱ्या थंडीचा जोर होता. त्यातच सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी आल्याने वातावरणातील गारवा अधिक वाढला. दरम्यान बुधवारी रात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गाराही पडल्या. गुरुवारी नागपूरचे कमाल तापमान २५.७ अंश. से. तर किमान तापमान १८.७ अंश से. नोंदवण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Rain fall of New Year