शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

राष्ट्रवादीसाठी पाऊस, ईडी ‘लकी’च- खा. सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 07:58 IST

खोट्या आरोपातच विरोधकांना मिळतो आनंद

चंद्रपूर : कोणी कितीही आरोप केले आणि कितीही चौकशी लावली तरीही काहीही फरक पडणार नाही. खोटे आरोप केल्याने खूप प्रसिद्धी मिळते, यामध्ये विरोधकांना आनंद वाटतो. ईडी आणि पाऊस या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी लकीच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत राहू. आमच्यावर टीका केल्यामुळे जर कुणी मोठे होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. ट्रकभर पुरावे कुठे गेले, हे महाराष्ट्राने बघितले आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी त्या चंद्रपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. मागील काही दिवसांमध्ये अनेकांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लावण्यात आला आहे. त्यातही पवार कुटुंबीयावर अधिक लक्ष दिले जात आहे. ईडी किंवा इतर चौकशींना आम्ही घाबरत नाही. कोणीही कितीही चौकशी करू द्या, सत्य बाहेर येईल, असेही त्या म्हणाल्या.ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तरीही ओबीसी नेत्यांनी आपल्याला आणखी मार्गदर्शन करावे, सर्वांनी मिळून प्रयत्न करून ओबीसींचा प्रश्न मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले. राज्यात महाआघाडी सरकार चांगले काम करीत आहे. लसीकरणामध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच कामात नाही तर प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला समोर न्यायचे असल्याचे त्या म्हणाल्या. मी खासदारच, फडणवीसांना चिमटाकाही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आताही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असल्याचे वक्तव्य केले होते.  त्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, कोणाला काय वाटते, हे माहीत नाही. मात्र, मी खासदार आहे आणि मला खासदारच असल्यासारखे वाटते. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय