पावसामुळे बत्ती गुल!
By Admin | Updated: June 22, 2015 05:10 IST2015-06-22T05:10:15+5:302015-06-22T05:10:15+5:30
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बेस्टच्या सुमारे १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी १० हजार मीटरधारकांचा

पावसामुळे बत्ती गुल!
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बेस्टच्या सुमारे १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी १० हजार मीटरधारकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपात पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
पावसामुळे सुमारे २०० केबलमधील दोष नोंदविण्यात आले असून, त्यापैकी १२० दोष तात्पुरते किंवा कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)