शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच; कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी सर्वदूर दमदार वृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 07:23 IST

मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत शनिवारी पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ ते १० च्यादरम्यान दादरपासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर याठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकर शनिवारी साखरझोपेत असतानाच पुन्हा एकदा आकाशात अतिवृष्टीचे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबत जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली आणि काही क्षणातच पावसाने मुंबईला झाेडपून काढले. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गातही सायंकाळनंतर पावसाने जोर लावला आहे. विदर्भातही सर्वदूर दमदार सरी कोसळल्या.

मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ ते १० च्यादरम्यान दादरपासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर याठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या काळात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरूच होता. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला कवेत घेतले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर जणूकाही ओढे वाहू लागले आहेत, असे चित्र होते. पावसामुळे वाहतुकीला ब्रेक लागला होता. दुपारी तसेच संध्याकाळी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळपासून विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळनंतर संततधार सुरू आहे. हवामान खात्याने दि. १२ व

१३ जूनरोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धोकादायक ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगडला रेड अलर्टमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळी पावसाने धिंगाणा घातला होता. मात्र दुपारनंतर येथील जोर ओसरला. हवामानातील बदलानुसार, आता रविवारी मुंबई, ठाणे, पालघर व सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, रायगड व रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस