राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय
By Admin | Updated: August 12, 2015 02:35 IST2015-08-12T02:35:01+5:302015-08-12T02:35:01+5:30
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाला

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाला अधिक जोर राहिला. पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. मंगळवारी कोकणासह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुनरागमन केल्याने काहीसा दिलासा मिळालेला आहे. उत्तर आंध्रप्रदेश - दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या पश्चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिमाणी राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात चंद्रपूर व वर्धा येथे प्रत्येकी २१ मिमी पाऊस पडला. तर यवतमाळ येथेही १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूर, अमरावतीतही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली या भागात पावसाने हजेरी लावली.
येत्या गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवानानशास्त्र विभागाने व्यक्त केली.
मंगळवारी काही शहरांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
कोल्हापुर ०.२, महाबळेश्वर ५, नाशिक २, सांगली १, मुंबई ३, अलीबाग ७, रत्नागिरी २, औरंगाबाद २, परभणी ०.२, बीड १, अमरावती ६, चंद्रपुर २१, नागपूर ८, वर्धा २१, यवतमाळ १४.