मुंबई उपनगरांत पुन्हा अवकाळी पाऊस

By Admin | Updated: April 5, 2016 10:19 IST2016-04-05T08:30:15+5:302016-04-05T10:19:40+5:30

अंधेरी, बोरिवली या मुंबईच्या उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळीच अवकाळी पावासाने हजेरी लावाल्याने सामान्यांची त्रेधातिरपीट उडाली असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली.

Rain again in Mumbai suburbs | मुंबई उपनगरांत पुन्हा अवकाळी पाऊस

मुंबई उपनगरांत पुन्हा अवकाळी पाऊस

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - अंधेरी, बोरिवली या मुंबईच्या उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळीच अवकाळी पावासाने हजेरी लावाल्याने सामान्यांची त्रेधातिरपीट उडाली असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. बोरिवली ते विरार या भागात सकाळी सातच्या सुमारासच पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या असून कामावर जाण्यास निघालेल्या चाकरमान्यांनाही याचा फटका बसला. दरम्यान दादर, भायखळा भागांतही ढगाळ वातावरण असून तिथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहेत.
याच पावसाचा पश्चिम रेल्वेलाही फटका बसला आहे. बोरिवलीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने विरारहून चर्चगेटकडे जाणा-या लोकल सेवेवर परिणा झाला असून स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. 

Web Title: Rain again in Mumbai suburbs