महापालिका टोचणार रेल्वेचे कान
By Admin | Updated: August 5, 2016 22:21 IST2016-08-05T22:21:27+5:302016-08-05T22:21:27+5:30
गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला.

महापालिका टोचणार रेल्वेचे कान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला. पावसाळ््यापूर्वी रेल्वे रुळालगतचे छोटे नाले साफ करण्यासाठी पालिकेने कोटयवधी रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही दरवर्षी प्रमाणे यंदा हेच चित्र असल्याने पालिका आता रेल्वेचे कान टोचणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेचे दावे फोल ठरवत सखल भाग पाण्याखाली गेला. मात्र पाणी साठल्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विशेषत: मध्य रेल्वेची वाहतुकही काही तासांसाठी ठप्पच होती. सायन, कुर्ला, माटुंगा, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते.
या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील आपत्कालीन नियोजनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोटे नाल्यांच्या साफसफाईसाठी पालिका रेल्वेला ठराविक रक्कम देत असते. मात्र वांरवार सुचना देवूनही रेल्वे हे छोटे नाले साफ केल्याचा भास निर्माण करते. प्रत्यक्षात पावसाळ््यात रेल्वेच्या साफसफाईची पोलखोल होत असल्याची नाराजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
....................
पालिका पाठवणार रेल्वे प्रशासनाला पत्र
पालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाला याप्रकरणी खरमरीत पत्र लिहणार आहे. पावसाळ््यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची नोंद घेण्यात आली आहे. ही निरीक्षणे पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या वृत्ताला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.