शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाराष्ट्रात ८० हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:58 IST

यूपीए सरकारच्या तुलनेत केंद्राने दिला राज्यासाठी अधिक निधी

हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या काळात रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा झालेला दिसत आहे. २०१४ ते २०१९ या काळात रेल्वेच्या नवीन लाइन टाकणे, रुळांचे रूपांतरण आणि दुहेरीकरण असे ८०,०७९ कोटींची कामे राज्यात सुरू आहेत. २००९-१४ मध्ये १,१७१ कोटी रुपये या कामांसाठी मिळाले होते. त्या तुलनेत २०१४-१९ या काळात सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय वाटप ४,८०१ कोटी रुपये प्रतिवर्ष करण्यात आले. हे सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय वाटपापेक्षा ३०० टक्के अधिक आहे. 

२००९-१४ मधील सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय वाटप रु. १,१७१ कोटी रुपयांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील वाटप हे ९१६ टक्के अधिक म्हणजे ११,९०३ कोटी रुपये आहे. 

२०१४-२२ मध्ये रेल्वे लाइनचे काम १४४ टक्के अधिक म्हणजे १४२.६३ किमी प्रति वर्ष होते. यूपीएच्या काळात हेच काम ५८.४ किमी प्रति वर्ष होते. संसदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांतून ही माहिती मिळालेली आहे. ३४ रेल्वे प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प नवीन लाइनसंबंधित आहेत. २ रुळांचे रूपांतरण आहे, तर १६ लाइनच्या दुहेरीकरणाचे आहेत.

महाराष्ट्रातून जाणाऱ्या ६,११८ किमी लांब रेल्वे लाइनचे काम अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांत आहे. यातील १,१५४ किमीचे काम सुरू करण्यात आले आहे. यावर ३१ मार्चपर्यंत २०२२ पर्यंत २१,२९७ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 

रेल्वेने महाराष्ट्रातून पूर्णपणे अथवा काही प्रमाणात जाणाऱ्या नव्या लाइन, रूळ रूपांतरण योजनेसाठी एकूण १९ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. ७,०६२ कोटी रुपये खर्चाच्या ५८० किमी लांबीच्या रूळ रूपांतरण योजनेचे काम वेगाने सुरू आहे.

तर १६ दुहेरीकरण योजनांमध्ये ३४,६५८ कोटी रुपये खर्चाच्या ३,५२१ किमी लांबीच्या योजनेचाही यात समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई