शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

Budget 2018 : राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:08 IST

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला १ हजार किमीच्या नव्या मार्गिका तसेच १ हजार किमीच्या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे विस्तारणार असून कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला १ हजार किमीच्या नव्या मार्गिका तसेच १ हजार किमीच्या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे विस्तारणार असून कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचा तसा प्रयत्न असून त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मार्गांसह विद्युतीकरणदेखील करण्यात येणार आहे.१५ मार्गांवर नवे मार्ग, दुपदरीकरण तसेच ६ विविध भागांमध्ये विद्युतीकरण झपाट्याने करण्याची तरतूद यंदा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच राज्यातील रेल्वेच्या विद्युतीकरणामध्ये मिरज-पंढरपूर १३८ किमी, जसई-उरण १० किमी, पेण-रोहा ६७ किमी, पनवेल-पेण-थळ ७५ किमी, जसई-जेएनपीटी ९ किमी आणि भिगवण-वाशिंबे, गुलबर्गा-अक्कलकोट रोड या मार्गांचा समावेश आहे. दोन्ही मिळून ६० किमीपर्यंत असे एकूण मध्य रेल्वेमार्गावर ३५९ किमीचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.या मार्गांचे दुपदरीकरणबाबलाड-गुलबर्गा ५.४२ किमी, भालवणी-जेऊर ७.७३ किमी, बोरोटी-दुधनी १३.६६ किमी, दुधनी-कुलाली ९.८३ किमी, गाणगापूर रोड-हुंसीहादगील ६.५८ किमी, जळगाव-भादली ११.५१ किमी, जेऊर-पोफळाज ८.६३ किमी, केम-भालवणी ८.३३ किमी, कुर्डुवाडी-धवळास ९.७२ किमी, पोफळाज-वाशिंबे ९.९७ किमी, पुणे-फुरसुंगी १६.५१ किमी, सावलागी-बाबलाड ७.५८ किमी, वाडसिंगे-कुर्डुवाडी ८.११ किमी, वाशिंबे-पारेवाडी ७.०९ किमी, कल्याण-टिटवाळा १०.८४ किमी अशा पद्धतीने मध्य रेल्वेवरील एकूण १४१.५१ किमीच्या रेल्वेमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेBudget 2018अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्र