पेय जलासाठी रेल्वे प्रशासनाची उदासीनता
By Admin | Updated: May 22, 2014 20:18 IST2014-05-21T22:55:07+5:302014-05-22T20:18:45+5:30
- पाण्याच्या टाक्यांची साफसफाई नाही; थंड पाण्याच्या नळांना लहान धार

पेय जलासाठी रेल्वे प्रशासनाची उदासीनता
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर पेय जलासाठी रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. फलाटांवरील थंड पाण्याच्या मशीनद्वारे नागरिकांना खार्या पाण्याचा पुरवठा होत असून, नळाला पाण्याची अत्यंत लहान धार असल्याने वेळेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड पडत असून, नाईलाजास्तव प्रवाशांवर थंड पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून फलाटांवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई झाली नसल्याने त्यात तळाशी गाळ साचला आहे.
मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक १ व २ वर चोवीस तास गाड्यांचे आवागमन सुरू असते. प्रवाशांच्या सेवेसाठी दोन्ही फलाटांवर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी वॉटर कुलरदेखील लावण्यात आले आहेत. मात्र, नळाची धार इतकी कमी आहे की, प्रवाशाला पाण्याची बाटली भरताना पाच मिनिट केव्हा झाले कळतच नाही. अशात गाडी सुटण्याची शक्यता असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना थंड पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. (प्रतिनिधी)