रेल्वे हमालांचीही आता दरवाढ

By Admin | Updated: July 4, 2014 06:19 IST2014-07-04T06:19:55+5:302014-07-04T06:19:55+5:30

रेल्वे टर्मिनसवरील प्रवाशांच्या सामानाचा भार हलका करणाऱ्या परवाना धारक हमालांची हमाली आता वाढली आहे. सामानाच्या वजनानुसार हमालीच्या दरात वाढ झाली

Rail hamalachal prices are also rising | रेल्वे हमालांचीही आता दरवाढ

रेल्वे हमालांचीही आता दरवाढ

मुंबई : रेल्वे टर्मिनसवरील प्रवाशांच्या सामानाचा भार हलका करणाऱ्या परवाना धारक हमालांची हमाली आता वाढली आहे. सामानाच्या वजनानुसार हमालीच्या दरात वाढ झाली असून, त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. १0 ते २0 रुपयांपर्यंत हे दर वाढवल्याचे रेल्वेने सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि त्यापुढील महत्त्वाच्या टर्मिनसवर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि सुरत आणि त्यापुढील टर्मिनसवर परवानाधारक हमाल आहेत. या टर्मिनसवरुन मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. ठरलेल्या दराप्रमाणे प्रवाशांना त्यांना शुल्क द्यावे लागतात. मात्र त्यांची हमाली वाढविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी या दरात बदल करायचे की नाही, याचा निर्णय रेल्वेकडून घेतला जातो.
यंदा हमालीत सामानाच्या प्रकारानुसार १0 ते २0 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ट्रिपमागे पूर्वी परवानाधारकांना ३५ रुपये मोजावे लागत होते. आता ४0 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर ए-१, बी तसेच सी श्रेणीच्या स्थानकांसाठी असतील. तर अन्य स्थानकांसाठी आताचे दर ३५ रुपये होतील. यापूर्वी अन्य छोट्या स्थानकांसाठी हेच दर २५ रुपये एवढे होते. दादर स्थानकात उतरल्यावर पश्चिम रेल्वेवरुन मध्य रेल्वे स्थानकाकडे किंवा मध्य रेल्वे स्थानकातून पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी हमालाचे शुल्क ४0 रुपये असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Rail hamalachal prices are also rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.