शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खासदार धैर्यशील पाटलांना मोठा धक्का! थळ गटात आमदाराच्या सुनेचा विजय, निलिमा पाटील पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:14 IST

Nilima Dhairyasheel Patil defeated : रायगडमध्ये खासदारांना धक्का! थळ गटातून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा पराभव झाला असून आमदार जयंत पाटील यांच्या सून अदिती नाईक विजयी झाल्या आहेत. वाचा सविस्तर निकाल.

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या थळ जिल्हा परिषद गटातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. महायुतीमधील अंतर्गत लढत आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा पराभव झाला आहे. या अटीतटीच्या लढतीत अदिती नाईक यांनी बाजी मारली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांनी मोठे यश मिळवले होते, त्यामुळे त्यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, स्थानिक राजकारणात शेकाप (शेतकरी कामगार पक्ष) आणि स्थानिक आघाड्यांनी दिलेले आव्हान धैर्यशील पाटील यांना पेलता आले नाही. थळ गटात झालेल्या या पराभवामुळे खासदारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. २०१७ मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या पाबल मतदारसंघात भारतीय शेतकरी कामगार पक्ष पक्षाकडून उभे असलेल्या निलिमा धैर्यशील पाटील विजयी ठरल्या होत्या.

अदिती नाईक यांचा 'जायंट किलर' विजयदुसरीकडे, अदिती नाईक यांनी या विजयासह आपल्या राजकीय प्रवासाची दमदार सुरुवात केली आहे. थळ हा गट पारंपरिक रित्या शेकापचा गड मानला जातो, तो पुन्हा एकदा राखण्यात नाईक कुटुंबीयांना यश आले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अदिती नाईक यांनी आघाडी घेतली होती, जी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.

राजकीय समीकरणे बदलणार?या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. खासदारांच्या पत्नीचा पराभव झाल्याने विरोधकांना नवे बळ मिळाले असून, रायगडच्या राजकारणात 'पाटील विरुद्ध नाईक' हा संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for MP Patil: MLA's Daughter-in-Law Wins, Nilima Patil Loses

Web Summary : In a Raigad Zilla Parishad election upset, MP Dhairyasheel Patil's wife, Nilima Patil, lost to Aditi Naik. Naik's victory in the SheKaP stronghold shakes Patil's political base, potentially reshaping local politics.
टॅग्स :RaigadरायगडZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५