शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:09 IST

प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात इतरत्र कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या सहा जिल्ह्यांत मात्र अजूनही पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप टळलेला नाही, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. (The threat of corona persists in these six districts of the state; Medical experts warn.)

प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहेत. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी आणायची, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

गेल्या काही आठवड्यांपासून सरासरी ११ हजार ३० दैनंदिन रुग्णांची नोंद होते आहे. ७ ते १३ जूनदरम्यान राज्यात ७७ हजार २११ रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी ३० मे ते ६ जूनदरम्यान १ लाख ३ हजार ४८९ रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजार ७८४ असल्याचे दिसून आले आहे.

खबरदारीसाठी निर्बंधराज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, राज्यात २० हून अधिक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बंध काहीसे कठोर आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक