रिव्हर्समध्ये गाडी चालवत गाठले रायगड
By Admin | Updated: June 6, 2017 05:16 IST2017-06-06T05:16:37+5:302017-06-06T05:16:37+5:30
रायगडपर्यंत स्वीफ्ट गाडी रिव्हर्समध्ये चालवत एक वेगळा उपक्रम येथील संतोष राजशिर्के (वय ४५) यांनी केला आहे

रिव्हर्समध्ये गाडी चालवत गाठले रायगड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी भेकराईनगर येथून रायगडपर्यंत स्वीफ्ट गाडी रिव्हर्समध्ये चालवत एक वेगळा उपक्रम येथील संतोष राजशिर्के (वय ४५) यांनी केला आहे. सुमारे १९० किलोमीटरचा प्रवास हा त्यांनी गाडीच्या मागील आरशात पाहून केला. ते सकाळी ६ वाजता निघाले आणि सायंकाळी ७ वाजता रायगडावर पोहोचले.
काही वर्षांपूर्वी आपली सहाआसनी रिक्षा बंद पडल्यावर ती पुरंदरपासून घरी आणायची कशी, हा प्रश्न राजशिर्के यांना पडला. गाडी चालू होते का नाही, याचा प्रयत्न करीत असताना ती रिव्हर्स गिअरमध्येच चालत असल्याचे जाणवले. त्या वेळी त्यांनी पुरंदरपासून भेकराईनगरपर्यंत गाडी रिव्हर्समध्ये आणली. त्याच वेळी त्यांनी हा संकल्प केला होता, असे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले.