रायगडचे पोलीस निरीक्षक २५ हजारांची लाच घेताना गजाआड

By Admin | Updated: May 9, 2015 01:26 IST2015-05-09T01:26:29+5:302015-05-09T01:26:29+5:30

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत विभागाने

Raigad Police Inspector, Ghajad, while accepting a bribe of 25 thousand | रायगडचे पोलीस निरीक्षक २५ हजारांची लाच घेताना गजाआड

रायगडचे पोलीस निरीक्षक २५ हजारांची लाच घेताना गजाआड

अलिबाग : रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना शुक्रवारी अलिबागच्या न्यायालयाने ११ म पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रसायनी येथील तक्रारदार योगेश बागडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून आॅईल भेसळीचा धंदा बंद केला होता. अविनाश पाटील यांनी बागडे याला बोलावून घेतेले आणि आॅईल भेसळीचा धंदा सुरु कर असे सांगितले. मात्र त्यासाठी दोन लाख रुपयांचा हफ्ता महिन्याला देण्याची मागणी केली. त्यानंतर बागडेनी २५ हजार देण्याचे कबूल केले. याबाबतची तक्रार बागडे यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ७ मे २०१५ रोजी अलिबाग बस स्टँण्ड समोर येण्यास बागडे यांना पाटील यांनी सांगितले. पाटील रात्री साडे आठच्या सुमारास आले आणि २५ हजार घेऊन गेले. त्यांच्या वाहनाचा पाठलाग मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केला आणि आरसीएफ कॉलनीजवळ पोलिस निरीक्षक जहांगीर मकबुल मुलानी यांनी त्यांना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Raigad Police Inspector, Ghajad, while accepting a bribe of 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.