रायगड नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी, शिवसेना सरस
By Admin | Updated: January 11, 2016 12:59 IST2016-01-11T12:59:19+5:302016-01-11T12:59:29+5:30
रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत म्हसळा व माणगावमध्ये राष्ट्रवादीने तर पोलादपूर व तळा येथे शिवसेनेची बाजी मारली.

रायगड नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी, शिवसेना सरस
>ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. ११ - रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला असून म्हसळा आणि माणगावमध्ये राष्ट्रवादीने तर पोलादपूर आणि तळा येथे शिवसेनेची बाजी मारली आहे, खालापूर नगरपंचायतीमध्ये शेकापने विजय नोंदवला आहे. बलाढ्य पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचारामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती.
रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. ८२ जागांसाठी २४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. सुमार ७७.०२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला होता. आज सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली.
रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचा निकाल
म्हसळा नगरपंचायत : राष्ट्रवादी १०, काँग्रेस ३, अपक्ष ३, शिवसेना १
खालापुर नगरपंचायत : शेकाप १०, शिवसेना ५, राष्ट्रवादी २
पोलादपूर नगरपंचायत : शिवसेना १२, मनसे ०, भाजप ०, काँग्रेस ५, शेकाप ०, अपक्ष ०
तळा नगरपंचायत : शिवसेना १२, राष्ट्रवादी ५
माणगाव नगरपंचायत : राष्टवादी ११, शिवसेना ५, भाजप ०, काँग्रेस १, शेकाप ०, अपक्ष ०