महसूल वसुलीमध्ये रायगड जिल्हा सर्वप्रथम
By Admin | Updated: April 28, 2016 03:21 IST2016-04-28T03:21:23+5:302016-04-28T03:21:23+5:30
रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित के ला आहे.

महसूल वसुलीमध्ये रायगड जिल्हा सर्वप्रथम
जयंत धुळप,
अलिबाग-रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित के ला आहे. तब्बल १०२.२५ टक्के यश साध्य करून वार्षिक महसूल वसुलीमध्ये संपूर्ण कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग द्वितीय, पालघर तृतीय, रत्नागिरी चतुर्थ, मुंबई शहर पाचव्या, ठाणे सहाव्या तर मुंबई उपनगर जिल्हा सातव्या स्थानावर आहे.
जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक कर आणि शासकीय कर्ज वसुली यांचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरिता शासनाने २१२ कोटी ७२ लाख ४७ हजार रुपयांचा इष्टांक दिला होता. जिल्ह्यातील गौण खनिज महसुलातील सर्वात मोठी बाब असणारे रेती उत्खनन जिल्ह्यात बंद असल्याने त्यांतून प्राप्त होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल या आर्थिक वर्षात प्राप्त झाला नसला तरी जिल्ह्यातील १५ तहसीलदार कार्यालये आणि ८ उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालये यांनी वर्षभरात विक्रमी महसूल वसुली करून राज्य शासनाने दिलेला इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा महसूल संकलित करून, तब्बल १०२.२५ टक्के यश साध्य केले असल्याची माहिती रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण आठ महसूल उप विभागांत पनवेल उप विभागाने ५४ कोटी ६२ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल संकलित करून त्यांना दिलेला इष्टांक पार करून १३२.७७ टक्के महसूल वसूली साध्य केली असून, महसूल वसुलीत प्रथम क्रमांकाचा उप विभाग ठरला आहे. द्वितीय क्रमांकावर पेण उप विभाग असून, १८ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांची विक्रमी वसुली के ली. त्यांना दिलेला इष्टांक पार करून १२२.६५ टक्के महसूल वसुली केली आहे. अलिबाग उप विभागाने २० कोटी २२ लाख ८६ हजार रुपयांचा महसूल वसूल करून इष्टांक पार करून १०५.८३ टक्के महसूल वसुली केली आणि जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातील उर्वरित उप विभागात, महाड उप विभागाने ५ कोटी २५ लाख ५४ हजार (८६.१६ टक्के), कर्जत उप विभागाने २७ कोटी ८७ लाख ३३ हजार (७८.०७ टक्के), रोहा उप विभागाने ७ कोटी ९७ लाख ९३ हजार (५६.१२ टक्के), माणगाव उप विभागाने ४ कोटी ७९ हजार (४८.१८ टक्के), श्रीवर्धन उप विभागाने २ कोटी २ लाख ३८ हजार (३७.३८ टक्के) रुपये महसुलाचे संकलन केले आहे.