शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे विघ्न दूर; गणेशोत्सवात रायगड पोलिस व प्रशासनाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 06:34 IST

मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता.

अलिबाग : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विनाअपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या सात दिवसांत या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जात आहे.

मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. पेण-वडखळ हा सात किलोमीटरचा प्रवास अपघात आणि वाहतूककोंडीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत होता. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही उत्तम नियोजन केल्यामुळे अपघातांचे प्रसंग घडले नाहीत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवात अपघातांचे विघ्न दूर झाल्याचे मत कोकणवासियांमध्ये व्यक्त होत आहे.

१५० स्वयंसेवक आले धावून

गणेशोत्सवापूर्वी आणि या उत्सवकाळात पावसाने उघडीप दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्तेदुरुस्ती करता आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला नाही. मात्र ऊन आणि रस्त्यांवरील धुळीची तमा न बाळगता, पोलिस यंत्रणा, पोलिसमित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत होते. यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला. या वर्षी गणेशभक्तांची वाट सुखकर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला १५० स्वयंसेवक धावून आले होते. गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी असो वा इतर उद्भविणारे प्रश्न असो; त्यांचे निराकरण करण्यासाठी हे स्वयंसेवक महामार्गावर काम करीत होते.

टॅग्स :MumbaiमुंबईgoaगोवाAccidentअपघात