रायगड जिल्ह्यात ३१४ अतिक्रमणधारकांना अभय

By Admin | Updated: July 20, 2016 02:34 IST2016-07-20T02:34:07+5:302016-07-20T02:34:07+5:30

ठाणे जिल्ह्यापाठोपाठ नवी मुंबईतही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जात आहे.

In Raigad district, 314 encroachment holders are absent | रायगड जिल्ह्यात ३१४ अतिक्रमणधारकांना अभय

रायगड जिल्ह्यात ३१४ अतिक्रमणधारकांना अभय

आविष्कार देसाई,

अलिबाग- ठाणे जिल्ह्यापाठोपाठ नवी मुंबईतही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जात आहे. रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर अतिक्र मणधारकांना मात्र अभय दिल्याचे समोर आले आहे. ४९९ पैकी ३१४ प्रकरणातील सुमारे २०९ हेक्टर सरकारी जमिनीवरील अतिक्र मण आतापर्यंत नियमित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उरण, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये एकही अतिक्र मणाचे प्रकरण समोर आलेले नाही.
जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण वाढले आहे. सरकारी जागेमध्ये अतिक्र मण करणाऱ्यांची यादी ही २८ नोव्हेंबर १९९१ च्या सरकारी निर्णयानुसार करण्यात आली आहे.
माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक १९१ अतिक्रमणांची प्रकरणे समोर आली आहेत. तेथे १५४ हेक्टर क्षेत्रावर अतिक्र मण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात १६८, कर्जत ४४, मुरु ड ३५, रोहे तालुक्यात अतिक्रमणांची ३० प्रकरणे आहेत. त्यामध्ये अनुक्र मे १३१.६४, १४.६०, १४.८५ आणि १७.५६ हेक्टर क्षेत्र आहे.
अलिबाग तालुक्यात ८ प्रकरणात १० हेक्टर क्षेत्रावर अतिक्र मण झाले आहे. त्याचप्रमाणे पेण-एका भूखंडावर, पनवेलमध्ये तीन ठिकाणी १.५०६९ हेक्टर जागेत, खालापूरमध्ये ५ ठिकाणी ५.६९६० हेक्टर जागेवर, सुधागडमध्ये एका ठिकाणी ०.०५०० हेक्टर, म्हसळ्यातील तीन
ठिकाणी ४.७१०० हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे.
>रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाई करण्याआधी नियमाप्रमाणेच ती अतिक्र मणे नियमित करण्यात आली आहेत. उर्वरित अतिक्र मणांच्याबाबतीत पुरावे तपासून योग्य तो निर्णय देण्यात येईल.
- जयराज देशमुख,
कार्यालयीन चिटणीस

Web Title: In Raigad district, 314 encroachment holders are absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.