एसटीच्या १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापे

By Admin | Updated: September 4, 2015 01:01 IST2015-09-04T01:01:12+5:302015-09-04T01:01:12+5:30

एसटी आगारातच असणाऱ्या डिझेल पंपांवर वैधमापन शास्त्र विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. यात राज्यातील १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला

Raids on diesel pumps in ST Depot 17 | एसटीच्या १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापे

एसटीच्या १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापे

मुंबई : एसटी आगारातच असणाऱ्या डिझेल पंपांवर वैधमापन शास्त्र विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. यात राज्यातील १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला. यामध्ये एसटी गाड्यांना डिझेल पुरवताना नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने बीड व अमरावती आगारातील डिझेल पंप बंद करण्यात आले असून, उत्पादक डिलर्सविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाचे २५0 आगार असून, यात बसना डिझेल पुरवण्यासाठी पंप आहेत. मात्र हे डिझेल बस गाड्यांना पुरवताना काही नियम धाब्यावर बसवण्यात येतात. ही माहिती विभागाला मिळाली आणि त्यानुसार राज्यातील १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला. यात पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या आगारांचा समावेश आहे. वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी सांगितले की, कमी प्रमाणात बसना डिझेल पुरवतानाच नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १७ ठिकाणी छापा टाकण्यात आला असता अमरावती आणि बीड आगारातील डिझेल पंप दोषी आढळले. ते सध्या बंद करण्यात आले असल्याचे पाण्डेय म्हणाले.

Web Title: Raids on diesel pumps in ST Depot 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.