शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:05 IST

Rahuri Bypoll 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे राहुरीच्या राजकीय मैदानात आता युवा नेतृत्वाचा उदय पाहायला मिळणार आहे.

शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघात प्रदीर्घ काळ काम केले असून, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. अक्षय कर्डिले सध्या जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने मतदारसंघातील कर्डिले समर्थकांना मोठे बळ दिले आहे.

निवडणूक कार्यक्रम आणि लढतनिवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासमोर महाविकास आघाडीचे (विशेषतः प्राजक्त तनपुरे) तगडे आव्हान असण्याची शक्यता आहे. जरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असले, तरी आता प्रत्यक्ष लढत होण्याची चिन्हे आहेत.

बारामतीमध्येही पोटनिवडणूक...दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही निवडणूक लढविणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Nominates Akshay Kardile for Rahuri By-election, Legacy Challenge

Web Summary : Akshay Kardile, son of the late Shivaji Kardile, receives BJP nomination for Rahuri by-election. He faces a tough challenge from Mahavikas Aghadi. Baramati also has a by-election after Ajit Pawar's death.
टॅग्स :RahuriराहुरीShivaji Kardileyशिवाजीराव कर्डिलेBJPभाजपा