अहिल्यानगर जिल्ह्याती राहुरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. येथील माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्याने राहुरी मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राहुरीमधून भाजपाने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
दरम्यान, आज भाजपाच्या नेत्यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेरीस शरद पवार गटाने येथून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आता राहुरीमध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले आणि शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
Web Summary : Govind Mokate will contest Rahuri by-election for Sharad Pawar's party after Prajakt Tanpure withdrew. Mokate filed his nomination against BJP's Akshay Kardile. The by-election was called after Shivaji Kardile's death.
Web Summary : प्रजक्त तनपुरे के नाम वापस लेने के बाद गोविंद मोकाटे शरद पवार की पार्टी के लिए राहुरी उपचुनाव लड़ेंगे। मोकाटे ने भाजपा के अक्षय करदिले के खिलाफ नामांकन दाखिल किया। शिवाजी करदिले के निधन के बाद उपचुनाव बुलाया गया था।