शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court: राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला, सोबत वकीलही; सत्तासंघर्षाच्या निकालाची अवघ्या राज्याला उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:04 IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर काय होईल याची गेल्या १० महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिली आहे.

अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उद्याची सकाळ खूप गर्दीची असल्याचे म्हटले आहे. आजचा समलिंगी विवाह प्रकरणातील युक्तिवाद थांबविताना चंद्रचूड यांनी उद्या दोन निकाल द्यायचे आहेत, त्यामुळे पुढील सुनावणी ही उद्या दुपारी १२ नंतर होईल असे सांगितले आहे. राहुल शेवाळे दिल्लीला निघाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत

दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर काय होईल याची गेल्या १० महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिली आहे. डॉ.अभिषेक मनु सिंघवी यांना चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आणि हे दोन निकाल कोणते याची चर्चा सुरु झाली होती. उद्या आम्ही दोन खंडपीठांचे निकाल सांगणार आहोत, असे ते म्हणाले.

 पहिला निकाल हा राज्यातील सत्तासंघर्षाचा असेल तर दुसरा निकाल हा दिल्ली सरकार विरुद्ध एलजी प्रकरणाचा असणार आहे. 18 जानेवारी रोजी घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, राज्यात घडामोडींना सुरुवात झाली असून उद्याच्या निकालाची कुणकूण लागताच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सोबत वकील देखील असल्याने निकाल काय लागणार यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दरम्यान, आज युवासेनेचे आदित्य ठाकरे देखील ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत राजभवनावर दाखल झाले होते. ते सत्तासंघर्षासाठी नाही तर रस्ता कंत्राटात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेतली आहे. 

आज लोकमतला ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुलाखती देऊन लोकांना पडलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. या लिंक खालीलप्रमाणे....

१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

१६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Shewaleराहुल शेवाळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे