राहुल राज सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By Admin | Updated: April 7, 2016 16:18 IST2016-04-07T16:18:34+5:302016-04-07T16:18:34+5:30
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगच्या अडचणीत वाढ झाली असून त्याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

राहुल राज सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला
- प्रत्युषा बॅनर्जीचा आत्महत्या प्रकरण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगच्या अडचणीत वाढ झाली असून त्याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
गेल्या आठवड्यात मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी प्रत्युषा बॅनर्जीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राहुल राज सिंगच्याविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी गेल्या बुधवारी राहुल राज सिंगचे वकील नीरज गुप्ता यांनी खटल्यातून आपले वकीलपत्र मागे घेतलं असून त्यांनी तो अपेक्षित माहिती देत नसल्याचं कारण देत वकीलपत्र मागे घेत असल्याचं सांगितलं आहे.
त्यातच आता त्याचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. राहुल राज सिंगवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.