शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Narwekar : "मी माझ्या शेतजमिनीवर जात असताना.."; राहुल नार्वेकरांची व्हायरल Video वर पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 20:16 IST

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत स्वत:ची बाजू मांडली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.  उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?" असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही माणसांसोबत दिसत आहेत. यातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचंही दिसत आहे. 

राहुल नार्वेकर यांनी या व्हिडीओवर आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत स्वत:ची बाजू मांडली आहे. "वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझं नाव त्या घटनेशी जोडू नये ही नम्र विनंती" असं म्हणत नार्वेकर यांनी अलिबागमध्ये काय घडलं ते सांगितलं आहे. 

"आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडीओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझं नाव त्या घटनेशी जोडू नये ही नम्र विनंती" असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांनी एक व्हिडीओ शेअर करत "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?", असा सवालही केला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आणि काही लोक राहुल नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला पकडतात आणि त्याला मारहाण करतात. वाद सुरू झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे पुढे चालत जातात. ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तसेच निघून जातात.

 

राहुल नार्वेकरांसोबत वाद कशावरून झाला?

राहुल नार्वेकर यांना अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची जागा खरेदी करायची आहे. अडीच एकर जागा खरेदी करण्याचा व्यवहार सुरू होता. शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) नार्वेकर हे जागा मोजण्यासाठी तिथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत जागा मोजणी करणारे कर्मचारीही होते. सेजल शहा यांच्या जागेला लागून रमेश पाटील यांची जागा आहे. मोजणी करताना लगतच्या जागा मालकांना नोटीस देणे बंधनकारक आहे. 

रमेश पाटील यांना जागा मोजणीची कोणतीही नोटीस न देता राहुल नार्वेकर हे मोजणी करीत होते. या कारणावरून रमेश पाटील यांनी नार्वेकर आणि त्यांच्यासोबत आलेल्यांना जाब विचारला. त्यावरून बाचाबाची झाली. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप केला गेला. 

रमेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील लोक आक्रमक झाले. त्यांनी जाब विचारत राहुल नार्वेकर यांना घेरले. संतापलेल्या पाटील कुटुंबीयांनी एका व्यक्तीच्या कानशि‍लात मारल्या. वाद सुरू झाल्यानंतर नार्वेकर हे लगेच तिथून निघाले. बाहेर जात असताना त्यांनी एका पाटील कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी आम्ही घरी नसताना आमच्या जागेत कसे शिरलात असा सवाल केला. त्यानंतर नार्वेकर हे निघून गेले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Narwekar Reacts to Viral Video Near Farmland Dispute

Web Summary : Rahul Narwekar clarified a viral video: he witnessed a farmer dispute while visiting his land. He denies involvement, stating he only advised them to resolve it peacefully before leaving. Sanjay Raut questioned the incident, alleging Narwekar fled the scene.
टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरalibaugअलिबागViral Videoव्हायरल व्हिडिओ