शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:31 IST

संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. 

सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल.

आजवरचे विधानसभा अध्यक्ष (संयुक्त महाराष्ट्र)अध्यक्षांचे नाव    कार्यकाळ    राजकीय पक्षसयाजी सिलम    १ मे १९६० ते १२ मार्च १९६२    काँग्रेसबाळासाहेब भारदे     १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७    काँग्रेसबाळासाहेब भारदे    १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२    काँग्रेसबॅ. शेषराव वानखेडे    २२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७    काँग्रेसबाळासाहेब देसाई    ४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८    काँग्रेसशिवराज पाटील    १७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९    काँग्रेसप्राणलाल व्होरा    १ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०    काँग्रेसशरद शंकर दिघे    २ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५    काँग्रेसशंकरराव जगताप    २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०    काँग्रेसमधुकरराव चौधरी    २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५    काँग्रेसदत्ताजी नलावडे    २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९    शिवसेनाअरुण गुजराथी    २२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टो. २००४    राष्ट्रवादीबाबासाहेब कुपेकर    ६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९    राष्ट्रवादीदिलीप वळसे पाटील    ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४    राष्ट्रवादीहरीभाऊ बागडे    १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९    भाजपनाना पटोले    १ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१    काँग्रेसराहुल नार्वेकर    ३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२    भाजप

कोण आहेत नार्वेकर?कुलाबा; मुंबई या विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. ३ जुलै २०२२ रोजी ते विधानसभा अध्यक्ष झाले.विधानभवनची इमारत ही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच येते. ते बी.कॉम. एलएल.बी. आहेत. पूर्वी एकदा विधानपरिषदेचेही ते सदस्य होते. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचे विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभा