शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Narvekar Vidhansabha: राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 08:47 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडलेला अविश्वास ठराव अध्यक्षांनी नाकारला आहे. हा प्रस्ताव विधानसभेत न नाकारता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांना एक पत्र पाठवून नाकारल्याचे कळवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या भूमिकेवर पटोले यांनी आक्षेप घेतला असून चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव नाकारल्याचा दावा केला आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भात पटोले यांना पत्र पाठवून अध्यक्षांनी या प्रस्तावाला अनुमती नाकारली असल्याचे कळवले आहे. यासाठी विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या दिवशी म्हणजेच ४ जुलै रोजी विरोधकांनी अध्यक्षांविरोधात दिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला ४ जुलै २०२२ रोजी आमच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. तो अविश्वास प्रस्ताव नव्हता. २९ डिसेंबर २०२३ रोजी आम्ही दिलेला अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात आला. विधिमंडळ कामकाजाला काळिमा फासण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्या अविश्वासाच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. - नाना पटोले, आमदार, काँग्रेस

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन