एफटीआयआयच्या आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा
By Admin | Updated: July 31, 2015 09:28 IST2015-07-31T01:05:55+5:302015-07-31T09:28:59+5:30
एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) आंदोलनाला काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा पाठिंबा असून शुक्रवारी सकाळी ते खास विद्यार्थ्यांची भेट

एफटीआयआयच्या आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा
पुणे : एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) आंदोलनाला काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा पाठिंबा असून शुक्रवारी सकाळी ते खास विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भाजपाचे समर्थक समजल्या जाणाऱ्या गजेंद्र चौहान यांची निवड झाली आहे. ही निवड गुणवत्तेवर केली नसल्याचा आरोप करीत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेले ५० दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.