शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 18:24 IST

कोणताही जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गरजूंना मदत करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत...

मुंबईः सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती आणि चीन सीमेवर आपले २० जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुलजी गांधीजी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे कोणताही जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गरजूंना मदत करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज राज्यभरात गरजूंना तयार जेवण आणि अन्नधान्याचे वाटप केले जात आहेत. तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले जात असून डॉक्टर नर्सेस यांना PPE कीटचे वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच गेल्या तीन महिन्यांपासून अविरतपणे कार्यरत असणा-या कोरोना योद्ध्यांचा सन्मान काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज संगमनेर येथे गरजूंना जेवण, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप केले, कोरोना योद्ध्यांना PPE कीट दिले व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

संगमनेर येथील कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, देशात व राज्यात कोरोना आणि चीनच्या कारवाया असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. नागरिकांच्या सर्वोच्च हिताला प्राधान्य देत काँग्रेसने कायम देशासाठी काम केले आहे. राहुल गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला. काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ५ लाख गरजू गरिबांना तयार जेवण आणि अन्नधान्य कीट्सचे वाटप, ५ लाख नागरिकांना मास्कचे वाटप केले. राज्यभरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५ हजार कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. तसेच राज्यभरातील कोरोना संकटात लढणाऱ्या योद्धयांना पीपीई कीट, सॅनिटायझरचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संगमनेर येथील कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर तांबे,  ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,  यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन मिनिटे मौन राहून सीमेवर शहिद झालेल्या २० वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमरावती येथील रक्तदान शिबिरात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रक्तदान केले तर बुलढाण्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली येथे रक्तदान केले. नांदेड येथील कार्यक्रमात आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री. डी. पी. सावंत यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.  चंद्रपूर  जिल्ह्यात वरोराच्या आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील विविध भागात तयार जेवण, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, नर्स या कोरोना योद्ध्यांना PPE कीट देण्यात आले. आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सफाई कामगार यांचाही सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनीही मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत केली. या कार्यक्रमाला कसलेही उत्सवी स्वरुप न देता अत्यंत साधेपणाने सामाजिक भान राखत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस