शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद, विधानसभेत सभात्याग, पायऱ्यांवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:58 IST

भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधींना जास्तच घाबरू लागला आहे.

मुंबई : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग करत निषेध केला. लोकशाहीच्या विरोधात हा निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विधानसभेतून सभात्याग केल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी काळ्या फिती लावून विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला.कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भाजप सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे...भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधींना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत त्यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली आहे.  केम्ब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माइक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे, याचा हा पुरावा असल्याची टीका विधिमंडळातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

लोकशाहीला धक्कामतमतांतरे असूू शकतात; परंतु खासदारकी रद्द करणे संविधानात, लोकशाहीत बसत नाही. लोकसभेने घेतलेला हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMaharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवन