संघाच्या विचारधारेसमोर झुकणार नाही, देशालाही कोणापुढे झुकू देणार नाही- राहुल गांधी
By Admin | Updated: April 11, 2016 19:04 IST2016-04-11T18:58:20+5:302016-04-11T19:04:38+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे.
संघाच्या विचारधारेसमोर झुकणार नाही, देशालाही कोणापुढे झुकू देणार नाही- राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. संविधानाच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विरोधात लढा दिला, परंतु आजही मनूचा विचार देशात जिवंत असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या, यावेळी राहुल गांधी संघ आणि भाजपलाही लक्ष्य केलं आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे तर बलिदान असल्याचं बोलत भाजपला टोमणा मारला आहे. कस्तुचंद पार्कमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं असून, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते यासभेला उपस्थित आहेत. राहुल गांधी आज नागपुरात मुक्काम करणार आहेत.
राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे-
-रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान
-आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले
-आरएसएस भाजप मनूचं रक्षण करतात -
-राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर केला हल्ला
-काँग्रेस पक्ष बाबासाहेबांसोबत उभा राहिला
-संविधानांच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनूच्या विरोधात लढा दिला, परंतू आजही मनूचा विचार देशात जिवंत आहे
-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या