शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, वातावरण पेटणार?; भाजपा-काँग्रेस एकमेकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 18:16 IST

मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू असं नाना पटोले म्हणाले.

मुंबई - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही राहुल गांधी येणार असल्याचे पुढे आले. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी मगच यावं असं म्हटलं त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला प्रतिइशारा दिला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर भाजपावाले राहुल गांधींना चॅलेंज करत असतील. तर राहुल गांधी आता महाराष्ट्रात येणार आहेत. जर धमक असेल तर त्यांच्या केसालाही धक्का लावून पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. परंतु परंपरेला गालबोट लावायची हिंमत भाजपा करत असेल तर जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका काँग्रेसची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू. लोकसभेत शेतकऱ्यांना खालिस्तानी, आंदोलनजीवी असं पंतप्रधान म्हणाले. त्या नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली का? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला त्यांनी माफी मागितली का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरूणांच्या आत्महत्या, महागाई वाढवली, देशातील जनतेची माफी भाजपाने मागितली पाहिजे असंही त्यांनी मागणी केली. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?५ वेळा जाणीवपूर्वक राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला, महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राहुल गांधी मातोश्रीवर येतील यावर माझा विश्वास नाही. राहुल गांधी सत्ता नसताना ठाकरेंना भेटायला येतील असं वाटत नाही. मात्र यामागे काय राजकारण आहे ते शरद पवारच सांगू शकतील असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. 

संजय राऊत म्हणतात...वीर सावरकरांचे विचार वाचा, समजून घ्या आणि तुम्ही किती सावरकरांच्या विचारांचे पालन करता ते पाहा असं सांगत संजय राऊतांनी बावनकुळेंच्या इशाऱ्यावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा